सोमनाथ शिंदे गुरुजी ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत

Sunday 12 May 2024

माजी विद्यार्थी शिक्षक स्नेहमेळावा निम्मित १५ मे रोजी शिक्षक सन्मान रँली चे आयोजन .

 


                                     शेट च.ग.शहा  विद्यामंदिर लेंगरे च्या १९९९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी १५ मे २०२४ रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केला आहे.सदर मेळाव्यामध्ये शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी तसेच शिक्षक हा समाजाला दिशा देणार महत्वाचा घटक आहे.शिक्षक हा समाज जागृतीचे प्रेरणास्थान आहे.तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शना मुळे अनेक विद्यार्थी विविध पदावर पोहचली आहेत.त्यामुळे गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सर्व शिक्षकाचे बंँड ,हालगी ,झांज लावून सकाळी ८ वा लेंगरे येथील मारुती मंदिर पासून शेट च.ग.शहा विद्यामंदिर लेंगरे इथे पर्यंत शिक्षक सन्मान रँली चे आयोजन करण्यात आले आहे. 

                                                                               समाजातील शिक्षकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी एक  आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे . शिक्षक सन्मान  रँलीचे आयोजन समाजाचे शिक्षक प्रती असणारा आदरभाव व्यक्त करण्यासाठी केले असून सदर रँली मध्ये सर्व  विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहावे असे आवाहन श्री.आशिष कोले, श्री.सोमनाथ शिंदे सर, सचिन जाधव सर, श्रीकांत मोहिते, गणेश पवार, जितेंद्र शिंदे व १९९९ च्या बँच कडून केले आहे  .

    

       माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नियोजन खालीलप्रमाणे 








Wednesday 15 November 2023

शिक्षण क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्त्व सन्मानिय दीपक शितोळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

 


     जिल्हा परिषद शाळा खांबाळे चे पदवीधर शिक्षक सन्मानिय दीपक शितोळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! सन्मानिय शितोळे सर यांनी खानापूर व आटपाडी तालुक्यात नोकरी केली. विशेष करून त्यांनी जिल्हा परिषद शाळा लेंगरे व जिल्हा परिषद शाळा खानापूर, सुलतानगादे या ठिकाणी केलेल्या त्यांच्या कार्याला जवळून पाहण्याचा योग आला. लेंगरे  व खानापूर गावातील लोक व विदयार्थी त्यांच्या कार्याचा अजून ही उल्लेख करतात. जिल्हा परिषद शाळा लेंगरे शाळाच्या उभारणीच्या कामात त्यांचे योगदान मोलाचे होते. तचेस खानापूर शाळेत सुध्दा त्यांनी कमी वेळ सेवा केली परंतू त्याच्या कार्याचा ठसा उमटवला.

            शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम च्या माध्यमातून विदयार्थी घडविण्याचे काम केले. त्यांनी राबविलेला खानापूर शाळेत असतानाचा सूर्यग्रहण उपक्रम अजून ही लक्षात आहे.

           विद्यार्थी निष्ठा, लोकांना सहज सुलभ भाषेत समजावून सांगण्याची त्यांची पद्धत, मनमोकळे व्यक्तिमत्त्व, वाचन, सायकलिंग ची आवड, चौकस बुद्धिमत्ता, कोणत्याही गोष्टीची खोलात जाऊन अभ्यास करण्याची त्यांची पद्धत खरंच मनाला भावते. शिक्षण क्षेत्रात  जिल्हा परिषद शाळा विषयी प्रेम वाढविण्यासाठी  अशा व्यक्तिमत्वाचे योगदान मोलाचे आहे. खऱ्या अर्थाने ते आदर्श शिक्षक म्हणून त्यांचे कार्य सर्वांन  आदर्शवत आहे. शिक्षण क्षेत्रात त्याच्या हातून असेच उत्तम कार्य घडत जावो. ही मनपूर्वक सदिच्छा.

   

शितोळे सरांनी खानापूर शाळेत राबविलेला सूर्यग्रहण उपक्रम लिंक. < < <  येथे क्लिक करा.


 

  

Wednesday 25 October 2023

संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ साठी प्रश्नपत्रिका मागणी

                                  https://forms.gle/cABo2oG68nUbia9cA

              संकलित मूल्यमापन चाचणी १ प्रश्नपत्रिका मागणी  वरील लिंक वर click करून माहिती भरा 

                                        लिंक भरण्याबाबत   सूचना खालीलप्रमाणे आहेत .

सर्व अंक इंग्रजी मध्ये भरा .माहे सप्टेंबर २०२३ चा पट टाकावा . .सदर चाचणी सर्व जिल्हा परिषद शाळा खाजगी अनुदानित शाळा यासाठी असल्यामुळे सर्व शाळांनी सदर माहिती भरावी .मराठी व सेमी पट टाकावा.लहान शाळांनी मराठी मध्यम असेल तर फक्त मराठी पट टाकावा व इंग्रजी पट च्या ठिकाणी 0 लिहावे .व सेमी इंग्रजी शाळांनी मराठी पट ठिकाणी 0 लिहावे .सदर परीक्षा ३ री ते ८ वी मुलांसाठी आहे .

Saturday 14 October 2023

जिल्हा परिषद सांगली आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा खानापूरचे चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत.

 


जिल्हा परिषद सांगली आयोजित गुणवत्ता शोध परिक्षा सन २०२२-२३ च्या गुणवत्ता शोध परीक्षेत   जिल्हा परिषद शाळा खानापूर  शाळेचे चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत.जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेचा इयत्ता १ ली चा विद्यार्थी यश योगेश येडे .या विद्यार्थ्याने १०० पैकी ९२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा व तालुका यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे .तसेच इ ३ री चा विद्यार्थी देवराज दिपक हगारे याने ३०० पैकी २७० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वा व तालुका गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे.तसेच इ ६ वी ची विद्यार्थिनी श्रेया बलराज माने हिने ३०० पैकी २४४ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १८ वी  व तालुक्यात तिसरी आली आहे .तसेच इ ६ वी ची शुभांगी सतीश कुंभार या विद्यार्थीने २४0 गुण मिळवून  जिल्हा गुणवत्ता यादीत २० वी तालुका यादीत ६ वी आली आहे. जिल्हा परिषद शाळा खानापूर चे माजी मुख्याध्यापक व इ ६ वी चे वर्गशिक्षक श्री .तानाजी ठोंबरे सर  यांचे  वर्गातील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल मुख्याध्यापिका श्री. जयश्री गोपाळ सदामते  यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच गुणवत्ता यादीत विदयार्थी आल्याबद्दल अमर जाधव सर व सोमनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले 

                                          सदसदविद्यार्थीनी जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या नावलौकिकात भर टाकल्या बद्दल खानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मानिय सुरेश संपतराव मंडले साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिंनंदन केले.तसेच जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा चारुशिला विकास भगत ,शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष श्री.बलराज माने व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी  सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर सर्व यशस्वी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जिल्हा परिषद सांगली यांनी घेतला असून सर्व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यां जिल्हा परिषद शाळेत असतील त्या विद्यार्थ्याना जिल्हा परिषद सांगली कडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

        सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका जयश्री गोपाळ सदामते मँँडम ,तानाजी ठोंबरे  सर ,किरण  शिवशरण सर ,शोभा  तांदळे  मँँडम ,विजया  घुतुगडे  मँँडम,रंजना  भंडारे  मँँडम,अमर जाधव सर ,सारिका जाधव मँँडम ,ललिता ढाकरे  मँँडम,माया पाटील  मँँडम,सोमनाथ शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले .


Friday 6 October 2023

खानापूर तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य स्पर्धेत सदानंद रोकडे,सोमनाथ शिंदे,खलील मुल्ला प्रथम तर स्वाती पवार, निलेश टकले, अमोल आळंगे व्दितीय.

 






       

         दिनांक ०६-१०-२०२३ रोजी खानापूर तालुक्यातील शैक्षणिक साहित्य स्पर्धा अमर रमेश कोष्टी प्राथमिक शाळा विटा येथे पार पडल्या .सदर शैक्षणिक साहित्य स्पर्धेत   द्विशिक्षिकी गटामध्ये श्री सदानंद रोकडे सर यांचा प्रथम ,तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत सोमनाथ मुरलीधर शिंदे सर यांचा प्रथम  ,तर बहुशिक्षिकी शाळा गटामध्ये खलील मुल्ला सर यांचा प्रथम क्रमांक आला . द्विशिक्षिकी गटामध्ये स्वाती नामदेव पवार मँँडम,बहुशिक्षिकी गटामध्ये निलेश टकले सर  यांचा व तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत अमोल आळगे सर यांचा  द्वितीय क्रमांक आला.खानापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी साहेब श्री. विकास राजे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली  पार पाडलेल्या  या शैक्षणिक  साहित्य स्पर्धेस सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.दिलीप सानप साहेब ,सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.सुरेश मंडले साहेब .सन्मानिय केंद्रप्रमुख यलमार मँँडम  यांची उपस्थिती लाभली.  
सदर शैक्षणिक साहित्य स्पर्धेचे परिक्षण माहुली डी. एड कॉलेज चे प्राध्यापक श्री. भगवान वाजे सर,  चोथे एस. डी.  मॅडम व सुतार एस डी मॅडम यांनी केले.
 

तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे  
 *बहुशिक्षकी*
 1)खलील रज्जाक मुल्ला (नागेवाडी) --प्रथम क्रमांक
2) निलेश रमेश टकले (वेजेगाव )- द्वितीय क्रमांक
3) सौ सुप्रिया महेंद्र सूर्यवंशी (भाळवणी) -तृतीय क्रमांक
4) सौ संतोषी धनाजी साळुंखे (आळसंद)उत्तेजनार्थ प्रथम   
5) शिल्पा अनिल वडगावकर (चिखलहोळ) उत्तेजनार्थ द्वितीय
6) नवनाथ मधुकर सगरे (ढवळेश्वर )उत्तेजनार्थ तृतीय

*तंत्रज्ञानावर आधारीत साहित्य*
1) सोमनाथ मुरलीधर शिंदे खानापूर प्रथम क्रमांक
2) अमोल मधुकर आळंगे (पांगे मळा) द्वितीय क्रमांक
3) प्रियांका संजय निकम (गोडाचीवाडी) तृतीय क्रमांक
4) जावेद रफिक मनेरी ₹कुसबावडे )उत्तेजनार्थ प्रथम

  *द्विशिक्षकी*
1) सदानंद मुकुंद रोकडे (साळशिंगे )प्रथम क्रमांक
2) स्वाती नामदेव पवार (अग्रणी मळा )द्वितीय क्रमांक 
3) ऋषिकेश रामचंद्र महाले (एकेरी मळा)तृतीय क्रमांक
4) किशोर बापू चौरे ताडाचीवाडी उत्तेजनार्थ प्रथम
5) संभाजी रामचंद्र चव्हाण गोडाची वाडी उत्तेजनार्थ द्वितीय


स्पर्धेचे नियोजन सौ.सुप्रिया महाडिक मँँडम ,संगीता गुरव मँँडम व शुभांगी जानकर मॅडम यांनी केले. सन्मानिय सानप साहेब व मा.श्री .भगवान वाजे सर यांनी निकाल घोषित करून जिल्हा स्तारिय स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. सन्मानिय गटशिक्षणाधिकारी 
विकास राजे साहेब यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.






Monday 2 October 2023

जिल्हा परिषद शाळा खानापूर मध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी .



आज दिनांक ०२-१०-२०२३  रोजी जिल्हा परिषद शाळा खानापूर मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री गोपाळ सदामते यांनी श्रीफळ व पुष्प अर्पण केले. पदविधर शिक्षक श्री.तानाजी ठोंबर सर यांनी स्वागत व प्रास्ताविक सूत्रसंचालन केले. श्री. अमर जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले.

   कार्यक्रमास श्रीम.शोभा तांदळे मॅडम, विजया घुटुगडे मॅडम, रंजना भंडारे मॅडम, ललिता खुपसे मॅडम, माया पाटिल मॅडम, वैशाली शिंदे मॅडम व श्रुती धेंडे मॅडम व पालक उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य श्री अजित दळवी यांनी लायन क्लब च्या वतीने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

🌼💫 ✨ *वक्तृत्व स्पर्धा*✨💫🌼


🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤


❄️🍀 *लायन्स क्लब खानापूर आयोजित वक्तृत्व स्पर्धा*🍀❄️


🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙


जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की;

               *दिनांक*


     0️⃣4️⃣-🔟-2️⃣0️⃣2️⃣3️⃣


       *वार*- *बुधवार* रोजी


     ⚪ *ठिकाण* ⚪

▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️

 *जिल्हा परिषद शाळा खानापूर खालची शाळा येथे* 


🎈 *वेळ- सकाळी11.30 वाजता* 🎈


लायन्स क्लब खानापूर यांचे तर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


🌴🌴☘️ *स्पर्धेचे विषय* ☘️🌴🌴


*1) स्वच्छतेचे महत्व*

*2) झाडांचे महत्त्व*

 *3)माझी शाळा*

*4)आपला राष्ट्रध्वज*

*5)माझे स्वच्छ सुंदर गाव*

*6) माझे आवडते नेते*


याविषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धा होतील.



🏆🏆🏆 🏆 *बक्षिसे* 🏆🏆🏆🏆



🥇 *प्रथम क्रमांक-२५१ रुपये*🥇 


🥈 *व्दितीय क्रमांक -२०१ रुपये*🥈 


🥉 *तृतीय क्रमांक -१ ५१रुपये* 🥉


याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.

           

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी स्पर्धेत सहभागी व्हावे.



       *मुख्याध्यापक* 

*जिल्हा परिषद शाळा खानापूर*

🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

        






               


    


       

 

Friday 2 September 2022

जॉली बोर्ड कंपनी तर्फे जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेस ११ पिन बोर्ड भेट.

 


आज दिनांक ०२/०९/२०२२ रोजी जॉली बोर्ड कंपनी लिमिटेड सांगली चे व्यवस्थापक  श्री.अमोल शिंदे साहेब यांनी  जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेस  भेट देवून जॉली बोर्ड कंपनी तर्फे ११ पिन बोर्ड शाळेस भेट देण्यात आले.जिल्हा परिषद शाळा खानापूरच्या सर्व वर्गास पिन बोर्ड भेट देण्यात आले.जिल्हा परिषद शाळा खानापूर चे मुख्याध्यापक श्री.तानाजी  ठोंबरे सर यांच्या मागणी नंतर एका दिवसात जॉली बोर्ड कंपनी लिमिटेड सांगली चे व्यवस्थापक  श्री.अमोल शिंदे साहेब यांनी शाळेस भेट देवून पिन बोर्ड भेट देण्यात आले.लेंगरे येथील सन्मानिय श्री  मोहन शिंदे गुरुजी यांचे चिरंजीव असलेले सन्मानिय श्री अमोल शिंदे साहेब यांनी शिक्षण क्षेत्राशी असणारे जिव्हाळ्याचे नाते जपत जिल्हा परिषद शाळांना पिन बोर्ड  भेट देवून शिक्षण क्षेत्राशी आपुलकी जपली आहे .शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी ठोंबरे सर यांनी श्री.अमोल शिंदे साहेब यांचे सहर्ष स्वागत केले.श्री.अमर जाधव सर यांनी जॉली बोर्ड कंपनीचे शाळेच्या वतीने सहर्ष असे आभार मानले.कार्यक्रमास शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री.तानाजी ठोंबरे सर ,जॉली बोर्ड कंपनी लिमिटेड सांगली चे व्यवस्थापक  श्री.अमोल शिंदे साहेब,श्री अमर जाधव सर , श्रीम.शोभा तांदळे मँँडम,सौ.रंजना भंडारे  मँँडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

                                     जॉली बोर्ड  कंपनीचे जिल्हा परिषद शाळा खानापूर कडून खूप खूप आभार.


Saturday 2 April 2022

लेंगरे गावचा 'उरुस' ... म्हणजे ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप

 



सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील एक मोठे गाव ,हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या  कलंदर बाबा दर्गा साठी प्रसिद्ध असणारे ,सांस्कृतिक कलेची जोपासना करणारे गाव म्हणून  लेंगरे गावाची ओळख आहे.अनेक गलाई बांधवाच्या कष्टाने व आशीर्वादाने लेंगरे गावाच्या   विकासात भर पडलेली आहे.साधारण ४१२९ .०० हेक्टर क्षेत्र असणारे   २०११ च्या जनगणने नुसार ६१७४ लोकसंख्या असणारे सध्या साधारण दहा हजार च्या आसपास  लोकसंख्या असणारे  लेंगरे गाव आहे. लेंगरे गाव खऱ्या अर्थाने प्रसिद्ध आहे ते सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कलंदर बाबा  उरूसा मुळे

                                     गुढीपाडव्याच्या बरोबर आठव्या दिवशी लेंगरे गावाचा उरूस असतो.गुढीपाडव्याच्या दिवशी लेंगरे गावात बैलाच्या शिवळा असतात.कलंदर बाबाच्या टेकडीवर गावातील बैलांच्या शिवळा पळविल्या जातात.लेंगरे गावाच्या पंचक्रोशीतील  लोक पाडव्याच्या शिवळा पाहण्यासाठी येतात व त्या दिवसापासून लेंगरेकराना व लेंगरे पंचक्रोशीतील  लोकांना लेंगरे यात्रेची म्हणजे उरूसाची ओढ लागते.खानापूर तालुक्यातील मोठी यात्रा असल्यामुळे व बैलाच्या गाड्यांसाठी प्रसिद्ध असणारी यात्रा असल्यामुळे लोकांना यात्रेची ओढ अधिक असते.

   लेंगरे गावाच्या बाहेर गेलेले अनेक गलाई बांधव ,नोकरी  कामा निम्मित बाहेर गावी असणारे लोक आवर्जून लेंगरे यात्रेला उपस्थित रहातात. गुढीपाडव्यानंतर यात्रेचा बहर चालू होतो.  यात्रेतील  मानाचा समजला जाणारा गलफाचा मान सांगली जिल्हा परिषद चे माजी सदस्य खानापूर पंचायत समिती चे माजी सभापती स्वर्गीय जालिंदर(बापू)हरिबा शिंदे (पाटील)  यांच्या घरात असतो .जालिंदर बापू हे सांगली जिल्ह्यातील शांत संयमी दिलदार व्यक्तिमत्व ,देवमाणूस म्हणून प्रसिद्ध होते .सध्या  बापूचा मोठा मुलगा मच्छिंद्रनाथ जालिंदर शिंदे पाटील (आप्प्पा) यांचे कडे गलफाचा मान आहे.

                                                               तसेच मानाचा गाडा पळविण्याचा व पाहटेच्या मानाच्या गाड्याच्या मान खालची पाटील आळी श्री .श्रीरंग (आण्णा) शिंदे यांच्या भावाकीचा व लिंबाजी पाटलाच्या आळीचा मान आहे.तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाजातील व्यक्तींना  यात्रे मध्ये मान देवून सर्वांच्या सहकार्याने यात्रा मोठ्या दिमाखात पार पडली जाते. यात्रा कमिटी मध्ये श्री मधुकर पाटील (आप्पा) यांचे ही योगदान मोलाचे असते.

उरुसाचा पहिला दिवशी म्हणजे संदल दिवशी लेंगरे करांच्या अनेक  जणाच्या घरी कंदुरी असते. गावातील यात्रेला येणाऱ्या पाहुण्यांना कंदूरी निमित मटण चारून स्वागत केले जाते. कलंदर बाबाचे नवस म्हणून संदल निमित्त बोकड कापून त्यांचा नैवद्य कलंदर बाबाला दाखविला जातो. फकीर जेवणासाठी बोलविले जातात.त्याच दिवशी सायंकाळी लेंगरे येथील प्रसिद्ध बँड पथक यांचा व भजनी मंडळ यांचा कार्यक्रम असतो . तसेच रात्री लोकनाट्य तमाशा असतो. ती रात्र लेंगरेकर जागून काढतात. यात्रेच्या मुख्य दिवशी पाहटे चार वाजता कलंदर बाबाला गलफ व चादर चाढविण्यासाठी गावातील सर्व लोक एकत्रीत जातात. गलफा समोर अतिशय रोमांचक असे विविध खेळ , धाडशी प्रकार केले जातात. कवाली गायली जाते . मोठ्या दिमाखाने  कलंदर बाबांना चादर चाढवली जाते. गाण्याचे आवाज फुलांच्या चादरा,अगराबतीच्या वास व कलंदर बाबा की दोन चार हो धिंग च्या घोषाने लेंगरे पेठ दणाणून निघते. 

गलफ व चादरच्या मागे मानाचे गाडे असतात. पहाटेचे मानाचे गाडे वाजत गाजत कलंदर बाबाच्या टेकडी वर जातात. व त्या ठिकाणी मोठ्या दिमाखात जोशात पळविले जातात. हजारो लेंगरे करांच्या डोळ्यांचे पारणे फिटले जाते. त्यानंतर यात्रेच्या मुख्य दिवशी कलंदर बाबा टेकडी वर दुपारी दोन पासून गाडे पाहण्यासाठी गर्दी होते. चार वाजे पर्यंत बैलांचे गाडे वाजत गाजत कलंदर बाबा टेकडी पर्यंत येतात. वर्षभर बैलांना चंदी चारून शेतकरी मेहनतीने बैलांची काळजी घेत असतात. त्या बैलांना वाजत गाजत टेकडी वर आणले जाते. कलंदर बाबा टेकडीवर गाडे मोठ्या दिमाखात जोशात आनंदात पळविले जातात. गाडा सरळ गेला की गाडा मालक एकदम खुश होतो. व आनंदाने आपला फेटा हवेत फेकतो. अन वर्षभर गाडा सरळ गेल्याची चर्चा गावभर चालु असते. यात्रेला लेंगरे पंचक्रोशीतील भुड ,माधळमुठी, वाळूज, देविखिंडी, व अनेक आसपासच्या गावातील लोकही आपली बैले कलंदर बाबाच्या टेकडीवर पळविण्यासाठी आणतात. अश्या प्रकारे यात्रेचा मुख्य दिवस पार पडतो. यात्रेला मुलांना अनेक खेळणी पाळणे व विविध विक्रेते याचे स्टाल असतात. त्यामुळे सर्व गाव फुलून निघते.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भव्य असे कुस्तीचे मैदान कलंदर बाबा कुस्ती आखाड्यात भरते. महाराष्ट्रातील अनेक मात्तबर मल्ल लेंगरेच्या कुस्ती आखाड्याला हजेरी लावतात. लेंगरे गावातील अनेक लोकांना कुस्तीची प्रचंड आवड आहे. श्री.प्रशांत सावंत , साहेबलाला शेख,प्रकाश कदम  व त्यांचे सहकारी,  कुस्तीची आवड असणारी मंडळी लेंगरे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतात. पारंपारिक कुस्ती, लाल मातीतली कुस्ती अजून लेंगरे गावाने जपली आहे. ग्रामीण भागाच्या संस्कृतीची जपणूक खऱ्या अर्थाने लेंगरे यात्रेमुळे होत आहे. तसेच यात्रेमध्ये विविध कला, भजन, पोवाडे, लोकनाट्य तमाशा, बैलांच्या शर्यती व लेंगरे कराकडून केला जाणारा पाहुणचार, हिंदू मुस्लिम ऐक्य हे भारतामधील ग्रामीण संस्कृतीचे जपण्याचे मोठे काम लेंगरे उरुसा मुळे होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप पाहायचे असेल तर  लेंगरे उरुसाला नक्की या.

 लेंगरे गावचा उरूस हा ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप आहे.

संदल - ..........................सोमवार दिनांक  १५ /०४/२०२४ .
यात्रेचा मुख्य दिवस .......मंगळवार   दिनांक -१६ /०४/२०२४ 
कुस्त्या .......................... बुधवार १७/०४/२०२४ 

लाल शाहा बाज की दोन चार हो धींग !


श्री.सोमनाथ मुरलीधर शिंदे ( गुरुजी)







Tuesday 8 March 2022

जागतिक महिलादिन निमित्त महिलांच्या सन्मानार्थ जिल्हा परिषद शाळा खानापूर मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन.

 


आज ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त जिल्हा परिषद शाळा खानापूर मध्ये महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. खानापूर नगरी मध्ये स्वच्छतेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सौ. विजया घुटुगडे मॅडम, सौ. ललिता खूपसे मॅडम, सौ. रंजना भंडारे मॅडम , सौ वंदना बुचडे मॅडम (मुख्याध्यापिका जि प शाळा मेंगानवाडी), सौ. रेखाताई ठोंबरे मॅडम (मुख्याध्यापिका जि. प. शाळा मोही). गावित मॅडम व जयश्री तोडकर मॅडम (पदवीधर शिक्षिका जि. प . शाळा बलवडी यांचा शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान बद्दल सन्मान करण्यात आला.

               कर्तुत्वान  महिला बद्दल विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केली. तसेच मुलांना कर्तुत्वान महिलांच्या बद्दल अधिक माहिती प्रोजेक्टर च्या साहाय्याने दाखविण्यात आली.

              तसेच  महिलांच्या सन्मानार्थ मुलींच्या व महिलांच्या संगीत खुर्ची चे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांनी मुलींनी व शिक्षिकांनी  आनंद घेतला.मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धेत १) नजहत पिरजादे इ २ री,२) बिबीआयेशा इ ३री ३) शौर्या  इ १ ली ४) ऐश्वर्या इ ४थी या मुलींनी  यश संपादन केले.

              शिक्षिकांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत सौ. माया पाटील मॅडम यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक रंजना भंडारे मॅडम यांनी मिळविला. तसेच वंदना बुचडे मॅडम, ललिता खूपसे मॅडम , रेखाताई ठोंबरे मॅडम, विजया घुटूगडे मॅडम, जयश्री तोडकर मॅडम, गावित मॅडम यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन जि. प. शाळा खानापूर चे मुख्याध्यापक श्री. तानाजी ठोंबरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  जिल्हा परिषद शाळा खानापुर चे ज्येष्ठ शिक्षक श्री.किरण शिवशरण सर व पदवीधर शिक्षक सन्मानिय श्री.दीपक शितोळे सर  यांनी केले. आभार श्री. सोमनाथ शिंदे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास सौ. शोभा  तांदळे मॅडम व अमर जाधव सर , सारिका जाधव मॅडम यांचे सहकार्य लाभले तसेच खेडकर सर, सचिन माने सर ,बुचडे सर , शकील मुल्ला सर, शंकर भोसले सर (मुख्याध्यापक जि. प. शाळा बलवडी)  श्री. फिरोज नदाफ सर यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.












           

Saturday 5 March 2022

खानापुर (विटा ) तालुका स्तर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात संपन्न.

 


खानापूर तालुकास्तर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण विटा न प शाळा नंबर २ मध्ये दिनांक ०४/०३/२०२२ ते ०५/०३/२०२२ या कालावधीत  आयोजित करण्यात आले.खानापुर तालुक्याच्या गटशिक्षणाधकारी श्रीमती अनुराधा म्हेत्रे मॅडम यांच्या मार्गदर्शना नुसार अतिशय उत्कृष्टरीत्या शाळा व्यवस्थापन सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न झाले. सदर प्रशिक्षणातून शाळा व्यवस्थापन समितीची रचना कार्य जबाबदारी ; गुणवत्ता पूर्ण शिक्षणात शाळा व्यवस्थापन समितीचे योगदान; निपुण भारत अभियान , बालकांचे हकक व सुरक्षितता, शालेय आपत्ती व्यवस्थापन, शालेय आर्थिक व्यवस्थापन , शालेय विकास आराखडा, शाळेचे सामाजिक अंकेक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षणात सर्व शिक्षकांनी छान गटकार्य सादर केले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून सन्मानिय खानापुर , पळशी, रेणावी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुरेश मंडले साहेब, जिल्हा परिषद शाळा खानापूरचे सहशिक्षक श्री. सोमनाथ शिंदे सर , तसेच खानापूर तालुका स्तरीय समन्वयक व मार्गदर्शक खानापूर पं.स विषयतज्ञ सौ. निर्मला यादव मॅडम यांनी छान मार्गदर्शन केले.


      तसेच सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.सानप साहेब , जिल्हा स्तरीय मार्गदर्शक श्री. कुंभार सर, श्री.कोळेकर सर, तसेच श्री लवळे सर यांनी प्रशिक्षणाला भेट देवून मार्गदर्शन केले.

             खानापूर पंचायत समिती च्या वतीने उत्तम जेवणाचे व चहापानाचे व्यवस्था करण्यात आली व न. प शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक श्री. पाटिल सर यांनी प्रशिक्षण साठी हॉल व प्रोजेक्टर उपलब्ध करून देवून प्रशिक्षणासाठी मोठे सहकार्य केले.

शाळा व्यवस्थापन समिती सक्षमकरण प्रशिक्षणातील क्षणचित्रे

पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .


प्रशिक्षण अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.